लवकरच अवकाशात झेपवणार भारतीय बनावटीचे विमान


मुंबई – लवकरच अवकाशात झेप घेण्याच्या तयारीत कॅप्टन अमोल यादव यांनी तयार केलेल्या भारतीय बनावटीचे विमान असून डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत अमोल यादव यांनी बनविलेले विमान आकाशात भरारी घेण्याची दाट शक्यता आहे.

यादव यांनी कांदिवलीतील चारकोप येथे भारतीय बनावटीच्या विमानाचा पहिला लुक १९ सीटरचा असून सोमवारी पहिला लुक सर्वांसमोर आणला. कॅप्टन अमोल यादव यांच्या भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाचा प्रकल्प ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने ही वाटचाल असल्याचे बोलले जात आहे.

१७ वर्षांच्या मेहनतीनंतर मूळचे साताऱ्याचे रहिवाशी असणाऱ्या अमोल यांना भारतीय बनावटीचे विमान बनवण्यात यश आले आहे. अमोलचे मुंबईत राहात असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा सर्वासमोर आला आहे.

अमेरिकेत वैमानिक होण्यासाठी कॅप्टन यादव यांनी प्रशिक्षण घेतले आहे. अमोलसमोर अनेक देशांनी विमान तयार करण्याचे प्रस्ताव ठेवले होते. पण या सर्व प्रस्तावांना अमोलने नकार दिला. महाराष्ट्रातच कंपनी उभारायचे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील जागा देण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यातील ३० विमानतळांदरम्यान वाहतूकया प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या लहान आकाराच्या विमानामुळे सुरू करता येईल. त्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पायाभूत सुविधांची गरज भासणार नाही, असे कॅप्टन अमोल यादव यांनी सांगितले.

Leave a Comment