इक्बाल कासकरला जेरबंद करणारे एनकौंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा


भारताचा मोस्ट वाँटेड अंडरवल्ड डॉन दाऊद इब्राहमचा भाऊ इक्बाल कासकर याची धरपकड करणारे पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हे पोलिसदलात एन्काऊंट स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातातच पर त्याची कारकीर्दही अनेक विवादांनी भरलेली आहे. इक्बाल याला खंडणी व धमकी दिल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी त्याच्या मुंबईतील घरातून अटक केली आहे. एका व्यापार्‍याने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यावरून प्रदीप शर्मा व त्यांच्या पथकाने इक्बालची उचलबांगडी केली आहे.

प्रदीप शर्मा हे मुळचे उत्तरप्रदेशातले असून त्याचे वडील महाराष्ट्रातील धुळे येथे शिक्षक होते. शर्मा यांचे पदव्युत्तर शिक्षण धुळ्यातच झाले असून १९८३ मध्ये त्यांनी उपनिरीक्षक म्हणून पोलिस विभागात कामाला सुरवात केली. त्यांच्या नावावर आत्तापर्यंत ११३ एनकौंटर आहेत. अब तक ५६ या हिंदी चित्रपटाची कथा त्यांच्याच जीवनावर आधारित होती. मुंबई पोलिसात त्यांनी घाटकोपर व जहू या महत्त्वाच्या ठाण्याची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे.

शर्मा पोलिस सेवेत आले तेव्हा अंडरवर्ल्ड अगदी टॉपवर होते. दाऊद, छोटा राजन पोलिसांच्या हिट लिस्टवर होते. शर्मा यांच्याकडे या विभागाची सूत्रे आल्याबरोबर त्यांनी धडाक्याने काम सुरू केले व अनेक गुंडांचा फडशा पाडला. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना २००८ साली निलंबित करण्यात आले होते मात्र त्यातून सहीसलामत बाहेर पडून ते पुन्हा पोलिस सेवेत रूजू झाले. लष्करे तैयबाचे तीन अतिरेकी यमसदनी पाठविण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली आहे.

Leave a Comment