‘या’ देशात काढली जाते ममींना सजवून शोभायात्रा


इंडोनेशिया – आपल्याला देश-प्रदेशासोबत वेगवेगळ्या प्रथा पाहायला, ऐकायला किंवा वाचायला मिळतात. इंडोनेशिया देशातील सुलावेसी बेटावर अशीच एक विचित्र प्रथा पाहायला मिळते. आपल्या दफन केलेल्या नातेवाईकांची कबर खोदून त्यातून मृतदेह बाहेर काढले जातात आणि त्यांना सजवून त्यांची शोभायात्रा या ठिकाणी काढण्याची प्रथा आहे.

मोठ्यापांसून अगदी लहानांपर्यंत सर्व वयाची माणसे या उत्सवात सहभागी होतात. ३ वर्षातून एकदा त्यांच्या नातलगांची कबर खोदून त्यांचे मृतदेह या बेटावर राहणारे लोक बाहेर काढतात. त्या मृतदेहांना आपल्या आवडीची वस्त्रे, आभूषणे घालतात आणि त्यांची रस्त्यावरुन मानेने या उत्सावात शोभायात्रा काढतात. असे केल्याने पूर्वजांसोबतचे आपले नाते घट्ट होते, अशी या लोकांची धारणा आहे.

शकडो वर्षापूर्वी जेव्हा माणूस या बेटावर येऊन राहायला लागला तेव्हापासून ही प्रथा सुरू झाल्याचे बोलले जाते. बारुप्पू या गावातून मानेने हा उत्सव सुरू झाल्याची माहिती एका छायाचित्रकाराने दिली आहे. हे सर्व करण्यामुळे पूर्वजांचे चांगले आशिर्वाद आपल्याला मिळतात आणि कोणतीही अडचण निर्माण झाली तर त्यातून लगेच मार्ग मिळतो. या उत्सवात सर्व गाव अगदी काम बंद करुन आनंदाने सहभागी होतो. हा उत्सव पाहण्यासाठी देश तसेच परदेशातून हजारो पर्यटक येतात.

Leave a Comment