यापुढे नाही चालणार या ६ बँकांचे चेक


नवी दिल्ली : जर तुमचे खाते भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण झालेल्या सहा बँकांचे जुने चेक ३० सप्टेंबरनंतर बंद होणार आहेत.

५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना लवकरात लवकर नवे चेकबुक घेण्याची सूचना स्टेट बँक ऑफ इंडियाने केली आहे. ५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना विनंती केली जात आहे की त्यांनी ३० सप्टेंबर आधी एसबीआयच्या नव्या चेकबुकसाठी अर्ज करावेत. अन्यथा ३० सप्टेंबरनंतर जुने चेक अवैध ठरवले जातील.

स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर(SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ मैसूर(SBM),स्टेट बँक ऑफ पटियाला(SBP), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर(SBT) आणि भारतीय महिला बँक या बँकांचे एक एप्रिल २०१७ला स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले.

Leave a Comment