बिटकॉईन या व्हर्च्युअल किंवा आभासी क्रीप्टोकरन्सीला लाभत असलेली लोकप्रियता व ग्राहकांकडून त्यासाठी वाढत असलेली मागणी लक्षात घेऊन भारताची रिझर्व्ह बँक देशाचे स्वतःचे आभासी चलन आणण्याच्या दृष्टीने विचार करत असल्याचे समजते. बिटकॉईन हे जगातील पहिली क्रिप्टोकरन्सी मानले जाते. विशेष म्हणजे अशा आभासी चलनांबाबत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना चेतावणी दिली होती मात्र आता बिटकॉईन एक्स्चेंजच्या म्हणण्यानुसार रिझव्हॅ बँकच संपत्तीची देवता लक्ष्मीच्या नावाने अशी करन्सी आणण्याबाबत विचार करत आहे.
बिटकॉईन प्रमाणे रिझर्व बँक आभासी चलन आणणार
बिटकॉईन साठी प्रतिदिनी २५०० ग्राहकांची भर पडत आहे व पाच लाख लोकांनी ती डाऊनलोड केली आहे.२०१५ मध्ये आलेल्या कंपनीच्या बिटकॉईनला चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. याचाच अर्थ या चलनावर लोकांचा विश्वास वाढला आहे. हे लक्षात घेऊन भारतीय अर्थतज्ञ व रिझर्व्ह बँकेचा तज्ञ गट भारतीय चलन रूपया साठी डिजिटल पर्याय लक्ष्मी या आभासी चलनाच्या माध्यमातून देण्याबाबत विचार करत आहे.
या व्यवस्थेत अफरातफरी अथवा बॅड लोनसारखे धोके उद्भवू नयेत यासाठी स्टेट बँकेसह अनेक बँका तसेच आयबीएम, मायक्रोसॉफ्ट सारख्या तंत्र कंपन्यांतील तज्ञांचे सहकार्य घेतले जात आहे. या चलनाला ई मुद्रा असेही म्हटता येईल. कारण हे चलन फक्त संगणकावर दिसते, ते खिशात बाळगता येत नाही. २००९ साली अशा चलनाची प्रथम सुरवात झाली. ते जगात कुठेही सहज ट्रान्स्फर करता येते व कोणत्याही चलनात बदलून घेता येते.