मोबाईलमधले फोटो आता थेट करता येणार प्रिंट


एचपी ने बाजारात नुकत्याच लाँच केलेल्या पॉकेट साईज प्रिंटरमुळे युजर मोबाईल फोनमधील फोटो त्वरीत प्रिंट करण्याची सुविधा घेऊ शकणार आहेत. एचपी स्प्रोटेक्स या नावाने बाजारात आलेल्या या छोट्या प्रिंटरची किंमत आहे ८९९९ रूपये.

हा प्रिंटर ब्ल्यू टूथने थेट मोबाईलशी कनेक्ट करता येतो. त्यातून दोन बाय तीन इंची साईजचे फोटो प्रिंट करता येतात. या प्रिंटरमध्ये झिंक टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. या तंत्रामुळे शाई शिवायच टोनर कार्टेजचे फोटो स्मजप्रूफ, वॉटर रेझिस्टंट, कलरफुल स्वरूपात प्रिंट करता येतात. या प्रिंटरचे अॅपही आहे. त्याचा वापर अँड्राईड व आयओएस युजर फ्री डाऊनलेाड करून करू शकतात. या प्रिंटरच्या सहाय्याने सोशल मिडीया फेसबुक, इन्स्टाग्राम मधील फोटोही प्रिंट करता येतात.

Leave a Comment