पेटीएमची दिवाळी सेलसाठी १०० टक्के कॅशबॅक ऑफर


देशातील दोन बड्या ई कॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट व अमेझॉन ने ग्राहकांना दिवाळी खरेदीसाठी आकर्षित करण्याच्या हेतूने अनेक ऑफर्स जाहीर केल्या असून त्यात ९० टक्केंपर्यंत सवलत दिली आहे. ई कॉमर्स क्षेत्रात नव्यानेच उतरलेल्या पेटीएमने या दोन बड्या कंपन्यांना आव्हान देताना दिवाळीसाठी १०० टक्के कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. याचाच अर्थ कांही ठराविक उत्पादने या साईटवर मोफत मिळणार आहेत. विशेष म्हणजे ग्राहक ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने या सवलतींचा लाभ घेऊ शकणार आहेत.

पेटीएमचे सीओओ अमित सिन्हा या संदर्भात म्हणाले ग्राहक जर ९० टक्के सवलतीच्या दरात वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देत असतील तर मग त्यांना १०० टक्के सवलत का नको या विचाराने आम्ही ही योजना आखली आहे. यात कांही निवडक वस्तूंवर १०० टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात असून या योजनेचे नाव पुढच्या आठवड्यात जाहीर केले जाईल. मार्केटिंग, कॅशबॅक व प्रमोशन खर्चासाठी कंपनीने १००० कोटींचे बजेट ठरविले आहे. यात कंपनी ब्रँडससह दुकानदारांच्या सहकार्याने काम करणार आहे. ग्राहकांना या योजनेचा चांगला लाभ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरवर्षी अमेझॉनतर्फे अमेझॉन ग्रेट इंडियन सेल व फ्लिपकार्टतर्फे बिग बिलीयन डेज नावाने दिवाळी सेल लावले जातात.

Leave a Comment