सेल्फीप्रेमींसाठी आसुसने आणले तीन नवे फोन


मुंबई : झेनफोन सीरिजचे तीन सेल्फी स्मार्टफोन आसुसने भारतात लाँच केले असून यामध्ये झेनफोन ४ सेल्फी (३जीबी), झेनफोन सेल्फी (४जीबी) आणि झेनफोन ४ सेल्फी प्रो यांचा समावेश आहे. हे स्मार्टफोन २१ सप्टेंबरपासून विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील. झेनफोन ४ सेल्फी मध्ये कंपनीने दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत. एक ३जीबी रॅम ३२जीबी इंटर्नल स्टोरेज आणि दुसरे ४जीबी रॅम ६४जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट आहे. सेल्फी कॅमेरा ही या फोनची सर्वात मोठी विशेषता आहे.

झेनफोन ४ सेल्फीमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन, १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, २० आणि ८ मेगापिक्सेलचे दोन फ्रंट कॅमेरे, क्वालकॉम ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर, फेस डिटेक्शन ऑटो फोकस, ३०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून याची किंमत ९ हजार ९९९ तर ड्युअल रिअर कॅमेरा व्हेरिएंटची किंमत : १४ हजार ९९९ रुपये ऐवढी ठेवण्यात आली आहे.

झेनफोन ४ सेल्फी प्रोमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन, ४जीबी रॅम, ६४जीबी इंटर्नल स्टोरेज, क्वालकॉम ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर, २४ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, १६ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, फेस डिटेक्शन, ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ३०००mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये ऐवढी ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment