नवी दिल्ली : देशभरात लवकरच पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती एकसमान होण्याची शक्यता असून केंद्र सरकारकडून पेट्रोलियम पदार्थांचे दर एकसारखेच ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
…तर एकाच दरात मिळू शकते पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेलचे दर नैसर्गिक वायूंवर ५ टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारण्यात येणार असल्याने एकसमान होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच उद्योग जगतात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवरील व्हॅटचे दर कमी करण्यास राज्य सरकारांनी तयारी दर्शवली आहे. पण जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे.
या संदर्भातील वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांसंदर्भात चर्चा झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांवर सध्या जीएसटी आकारण्यात येत नाही. पेट्रोल-डिझेलवर जर जीएसटी लागू झाला तर ८० रुपयांत मिळणारे पेट्रोल अर्ध्या किंमतीत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण याच्या विक्रीत राज्य सरकारला सर्वाधिक कर मिळतो. जर पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लागू करण्यास राज्य सरकारने सहमती दर्शवली तर पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच होतील. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.