यंगून- आवर्जून भेट द्यावे असे सुंदर शहर


आपला शेजारी म्यानमारची राजधानी यंगून हे शहर भारतात रंगून नावाने ओळखले जाते. बॉलीवूड चित्रपटात ते रंगून या नावानेच येते. या शहराच्या नावाने आलेली काही गाणी भारतात चांगलीच गाजली आहेत. पैकी मेरे पिया गये रंगून वहाँसे किया हे टेलिफून हे गाणे. यंगून हे शहर कधी ना कधी आवर्जून अनुभवावे असे नक्कीच आहे. म्हणजे एकापेक्षा एक सुंदर पर्यटन स्थळांबरोबरच येथील स्ट्रीटफूड, चायना टाऊन मधील मार्केट, येथील हॉटेल आवर्जून अनुभवण्यासारखीही आहेत.

कंडोजी या सुंदर सरोवराकाठी बांधला गेलेला श्वेडागोन पॅगोडा सोन्याने मढलेला असून अतिशय देखणा आहे. हे जगातील सर्वात मोठे पवित्र बौध्दालय मानले जाते. दिवसाच्या कोणत्याही वेळेला हा पॅगोडा आकर्षक दिसतोच पण त्यातही सायंकाळी व रात्री तो फारच सुंदर दिसतो. शांततेचा प्रत्यक्ष अनुभव येथे घेता येतो. चौखटत्गी बुद्ध मंदिरातील बुद्धाची विशालकाय प्रतिमा १९७३ साली स्थापन केली गेली आहे. या मूर्तीची लांबी २१७ फुटांपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.


१९०१ मध्ये सुरू झालेले स्ट्रँड हॉटेल हा मान्यमारचा आयकॉन मानला जातो. व्हिक्टोरियन स्टाईलच्या या हॉटेलला जगभरातले पर्यटक आवर्जून भेट देतात. तेथे कॉकटेल घेण्याची मजा सांगून समजणारी नाही तर ती प्रत्यक्षात लुटायला हवी. यंगूनचे स्ट्रीट फूड हेही मोठे आकर्षण आहे. छोट्या छोट्या९९९ शन नूडल्स प्रसिद्ध आहेत. स्थानिक भाज्यांचा वापर त्यात केला जातो व त्यामुळे त्यांची चव अतिशय सुंदर असते. रस्त्याकडेच्या टपरीत मिळणारे स्वादिष्ट सामोसे वेगळ्याच चवीमुळे लक्षात राहतात.

कांडवजी पार्क सरोवराला भेट दिली तर स्थानिक लोकांची जीवनशैली समजते. येथून सूर्योदय व सूर्यास्त फारच मनोहर दिसतो. छोट्या टेकडीवर असलेला महाविझाया पॅगोडा प्रामुख्याने डोक्यावर पसरलेला आकाशाचा निळाशार घुमट व पॅगोडा जमिनीवर दिसणारी रंगीत कासवे या दोन आकर्षणांसाठी महत्त्वाचा. पर्यटनाला गेले म्हणजे शॉपिंग आलेच. त्यासाठी दिवस रात्र गर्दीने भरून वाहणारे चायना टाऊन गाठायला हवे. अनेक प्रकारच्या सुंदर वस्तू येथे मिळतात.

Leave a Comment