भारताच्या चार राज्यात औद्योगिक शहरे वसविणार जपान


गुजराथ, आंध्र, राजस्तान व तमीळनाडू या भारताच्या चार राज्यात जपानकडून औद्यागिक शहरांची उभारली केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गुरूवारी भारत जपान बिझिनेस लिडर्स फोरममध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले या चार राज्यात जपान इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरर्स सुरू करण्यात येत आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित संस्थेत नव भारताचे निर्माते तयार होतील तसेच नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रीक व हायब्रिड वाहनांसाठी लागणार्‍या लिथियम आयन बॅटरीचा कारखानाही सुरू केला जात आहे. वाराणसी मध्ये कन्व्हेंशन सेंटर सुरू केले गेले आहे त्याचे नामकरण रूद्राक्ष असे केले गेले आहे. टपाल विभागाबरोबरही जपान सरकारने करार केला आहे. त्यानुसार जपानी जेवण पोस्टाने मागविणे शक्य होईल. त्याचबरोबर देशभरात जपानी रेस्टॉरंटस सुरू केली जात असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

Leave a Comment