जोडीदाराबरेाबरची वफादारी यांच्याकडून शिका


आज आपल्या मानव जातीत बदफैलीपणा, व्याभिचार, जोडीदाराला धोका देणे या गोष्टी सर्रास केल्या जातात.किरकोळ कारणांवरून जन्मजन्माची साथ निभावण्याची घेतलेली वचने हा हा म्हणता मोडली जातात व घटस्फोट घेऊन एकमेकांपासून दूर होता येते. प्रेम ही भावनाच अलग आहे. त्यातून जोडीदाराचे प्रेम ही आणखी वेगळी चीज. माणसाने या बाबत कितीही गोडवे गायले तरी आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहण्याची शपथ न घेताही अनेक प्राणीपक्षी असे सुखाने नांदतात. इतकेच नव्हे तर जोडीदाराचा मृत्यू झाला तर दुसरा जोडीदार शोधत नाहीत. म्हणजे मृत्यूच त्यांना एकमेकांपासून दूर करू शकतो.

हंस- हे पक्षी दिसायला अतिशय डौलदार तसेच वागायलाही. हिंदीत दो हंसोंका जोडा बिछड गयो रे हे गाणे प्रसिद्ध आहेच. हंस हा सर्वाधिक वफादार पक्षी मानला जातो. नर हंस मादीसाठी घरटे बनवितो, अंडी उबविण्यास मदत करतो शिवाय पिलांची काळजी घेण्यासही मादीला मदत करतो. तो आपले संपूर्ण आयुष्य एकाच जोडीदाराबरोबर काढतो.

काळे गिधाड- काळे गिधाड आकाराने प्रचंड असते पण माणसाला गिधाडांची भीतीही वाटते. असा हा भयानक पक्षी त्याच्या जोडीदाराबरोबर मात्र वफादार असतो. इतकेच काय आपल्या जोडीदारावर दुसर्‍या कुणाची नजर असल्याची शंका आली तरी तो आक्रमक होतो.


घार- घार हा पक्षी तसा आक्रमक मानला जातो. नर घार थंडीच्या दिवसांत आकाशात उंच उंच एकट्यानेच विहरताना अनेकदा दिसतात मात्र प्रजननाचा काळ आला की आपल्या प्रेमाकडे ते परत येतात म्हणजे आपल्या मादीकडे परततात. घारही आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहते.

घुबड- घुबडाचे दर्शन आपण अशुभ मानतो. घुबडातील एक जात आहे बार्न. ही घुबडे प्रेमाची भाषा नजरेने बोलतात. म्हणजे नर डेाळ्याच्या इशार्‍यातून मादीला शिकार दाखवितो. प्रेम दाखविर्‍याची नर घुबडाची ही खास पद्धत आहे. घुबडेही आयुष्य एकाच जोडीदाराबरोबर काढतात.


लांडगे- आक्रमक वेगवान प्राणी अशी लांडग्याची ओळख आहे. पाहता पाहता ते शिकार फाडतात. मात्र आपल्या लाईफ पार्टनर बरोबर ते अतिशय प्रामाणिक असतात. मृत्यूच त्यांना एकमेकांपासून दूर करू शकतो. जंगलात लांडगा कधी एकटा दिसला तर खुशाल समजावे की तो जोडीदाराची वाट पाहतो आहे किवा त्याचा जोडीदार त्याला कायमचा सोडून गेला आहे.

उद मांजर- आपल्या रानमांजरांप्रमाणेच असलेले हे छोटे प्राणी प्रेम म्हणजे काय याचे उत्तम उदाहरण आहे. ही उदमांजरेही आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यभर एकत्र राहतातच पण आपले नाते चांगले राहावे यासाठी प्रयत्नही करतात.


लंगूर- एक प्रकारची माकडांची ही जात. या माकडांचे आयुष्य साधारण ४० वर्षांचे असते. ही माकडेही सगळे आयुष्य एकाच जोडीदाराबरोबर काढतात.


फ्रेंच एंजल फिश- दिसायला अतिशय देखणे असे हे मासे अतिशय शांत वृत्तीचे असतात. मात्र आपल्या जोडीदाराच्या जवळ कुणी येण्याच्या प्रयत्नात आहे असे दिसले तर आक्रमक होतात.


आक्टेापस- समुद्रातला आठ पायांचा हा जलचर दिसायला थोडा ओंगळ व भीतीदायक वाटतो मात्र तोही त्याचे आयुष्य एकाच जोडीदाराबरोबर काढतो. विशेष म्हणजे त्याचे आयुष्य फार नसते व अनेकदा रिलेशननंतर कांही काळातच त्याचा मृत्यू होतो.

Leave a Comment