गुगलची तेज पेमेंट सर्व्हीस १८ सप्टेंबरपासून भारतात सुरू


गुगलने त्यांची पेमेंट सर्व्हीस तेज या नावाने भारतात सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले असून १८ सप्टेंबरला ती लाँच केली जाणार आहे. त्यासाठी यूपीआय बेस्ड पेमेंट अॅप लाँच केले जात असून या प्रकारचे हे पहिलेच असे अॅप आहे. यात नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने लोकल डिजिटल पेमेंटच्या मोबाईल अॅपसाठी मल्टी बँक पार्टनरशीपला परवानगी दिली आहे.

हे अॅप अँड्राईड पे प्रमाणेच आहे.फक्त गुगल वॉलेट अँड्राईड पे सारख्या सध्याच्या पेमेंट सेवेपेक्षा वेगळी ऑप्शन्स त्यात दिली जात आहेत. हे अॅप गुगल स्टोअरमधून अन्य अॅप प्रमाणेच डाऊनलोड करता येणार आहे.

Leave a Comment