आता आशियाई बँकात भारतीयांचा काळा पैसा


परदेशी बँकातून लपलेला भारतीयांचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने जोरदार प्रयत्न सूरू केल्यानंतर भारतीयांनी आता हा पैसा लपविण्यासाठी आशियाई देशांतील बँकांकडे मोर्चा वळविला असल्याचे बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटस(बीआयएस) ने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

२०१५ मध्ये विदेशी बँकात भारतीयांचा ४ लाख कोटींचा काळा पैसा होता मात्र स्विस बँकांशी या संदर्भातील माहिती करार झाल्यानंतर आता हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया, मकाउ या देशांतील बँकांकडे हा काळा पैसा वळविला गेला असल्याचे दिसून अ्राले आहे. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर हा खुलासा झाला आहे. केवळ भारतीयच नाही तर अन्य देशातील नागरिकही त्यांचा काळा पैसा आशियाई देशांतील बँकांत ठेवण्यास पसंती देत असल्याचे बीआयएसच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment