आता टॅटूचा नवा ट्रेंड – हेअर टॅटू


अंगावर विविध ठिकाणी टॅटू काढून घेण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. अर्थात आजही अनेक लोक अगदी सेलेब्रिटीज सुद्धा कांही ना कांही कारणाने भले थोरले टॅटू अंगावर गोंदवून घेताना दिसतात. स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सी असो अथवा टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहली असो, त्यांच्या खेळातील कतृत्त्वाबरोबरच त्यांच्या अंगावर काढले गेलेले टॅटूही नेहमीच चर्चेचा विषय असतात.


आता टॅटूचा नवा ट्रेंड आला असून यात शरीरावर नाही तर केसावर टॅटू लावले जातात. हा प्रकार झपाट्याने लोकप्रिय होतो आहे याचे मुख्य कारण म्हणजे त्यामुळे केसांना वेगळा लूक तर मिळतोच पण हे टॅटू वापरणे शरीरावर काढल्या गेलेल्या टॅटूप्रमाणे वेदनादायी नाही. केसावरचे टॅटू कधीही काढता येतात व लावता येतात ही त्याची मोठी सोय.


आजकाल मेटॅलिक रंगातील हेअर टॅटूंना मोठी मागणी आहे. हे टॅटू म्हणजे टेंपररी टॅट्यू आहेत. त्यांच्या स्ट्रीप्स बाजारात विकत मिळतात. या स्ट्रीप्सवरून सोडवून हे टॅटू केसांना चिकटवायचे व नको असतील तेव्हा काढून टाकायचे. यांच्या मुळे केसांना कोणतीही हानी पोहोचत नाही. केसांवर हे टॅटू खूपच उठून दिसतात व वापरणारी व्यक्ती अपोआपच सेंटर ऑफ अॅक्ट्रॅक्शन बनते.