रेल्वेचा नवा नियम उडवणार प्रवाशांची झोप


नवी दिल्ली – लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेच्या वेळेवर भारतीय रेल्वेने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे परिणाम होणार असून याचा फटका शयनयान किंवा तृतीय एसीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. रात्री १० ते सकाळी सहा या वेळेतच या श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या जागेचा वापर झोपण्यासाठी करता येणार आहे. हा बदल रेल्वेने नव्याने लागू केलेल्या नियमावलीमध्ये करण्यात आला आहे.

सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीमध्ये केवळ बसण्यासाठी रेल्वेतील लोअर बर्थ हे वापरावेत, असे नव्या नियमांमध्ये म्हटले आहे. लोअर बर्थची जागा सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या पूर्वी बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. पण आता रात्री नऊऐवजी दहा वाजेपर्यंत लोअर बर्थची जागा बसण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे लोअर बर्थवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अप्पर बर्थपेक्षा एक तास कमी झोपता येणार आहे.

Leave a Comment