भारतीय बाजारपेठेत दाखल झाला ओप्पो ए ७१


आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात ओप्पो कंपनीने भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली असून अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित कलर ३.१ ओएसवर चालणारा ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन आहे. ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून गोल्ड आणि ब्लॅक या रंगांमध्ये सादर करण्यात आलेला हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या मॉडेलला खरेदी करणार्‍यांसाठी काही खास ऑफर्सदेखील फ्लिपकार्टने दिल्या आहेत. यात प्रामुख्याने सुलभ हप्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रिलायन्स जिओने ओप्पो ए ७१च्या खरेदीदाराला ३९९ रूपयात तीन महिन्यांपर्यंत मोफत कॉलिंगसह ६० जीबी अतिरिक्त डाटा देण्याचे जाहीर केले आहे.

मेटलची युनिबॉडी ओप्पो ए ७१ या मॉडेलमध्ये प्रदान करण्यात आली असून यात ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर एमटी६७५० टी हा प्रोसेसर त्याचबरोबर रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ३,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असेल. ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन १३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍याने युक्त आहे.

Leave a Comment