आता नोटाबंदीपूर्वीच्या मोठ्या रकमांच्या व्यवहारांची होणार चौकशी


नवी दिल्ली – आयकर विभाग आता नोटाबंदीच्या आधी मोठ्या रोख रकमेच्या स्वरुपात करण्यात आलेले व्यवहारांची चौकशी करणार आहे. आयकर विभागाकडून २०१०-११ पासून करण्यात आलेल्या रोख रकमेतील व्यवहारांची पडताळणी सुरु करण्यात आली असून या अंतर्गत २०१०-११ पासून आतापर्यंतच्या कालावधीत मालमत्ता खरेदी करणाऱ्यांनादेखील नोटिसा पाठवल्या जात आहेत. आयकर विभागाकडून मालमत्ता खरेदीची घोषित किंमत आणि घराची सरकारी किंमत यांच्यात फरक आढळून आल्यास नोटिसा बजावल्या जात आहेत.

आयकर विभागाने मोठ्या प्रमाणात रोख स्वरुपात करण्यात आलेल्या व्यवहारांची पडताळणी सुरु केली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या पडताळणीत रोख रकमेच्या स्वरुपात मोठे व्यवहार करणाऱ्यांची चौकशी करणार आहेत. संबंधितांनी समाधानकारक उत्तरे या चौकशीत न दिल्यास मूल्यांकन किंवा पूनर्मूल्यांकनाचे आदेश देण्याचे आदेश अधिकाऱ्यांकडून दिले जातील. उपलब्ध माहितीच्या आधारे प्रकरणाची तीव्रता लक्षात घेऊन त्यांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात येईल. यातील गंभीर प्रकरणांची तातडीने दखल करुन कारवाई करण्यात येईल,’ अशी माहिती आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Leave a Comment