सध्या घडीला व्हॉट्सअॅप म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. तरुणाई म्हणा किंवा ज्येष्ठ म्हणा अमका ग्रुप तमका ग्रुप बनवतच असतात. पण कधी कधी या ग्रुपवर आपल्याकडून चुकीने भलताच मेसेज भलत्याच व्यक्तीला मेसेज पाठवतो. त्यामुळे निर्माण होणार गोंधळ आपल्याला काही नव्याने सांगायला नको. पण होणार गोंधळ आता थांबवता येणार आहे, कारण आगामी काही दिवसांत व्हॉटसअॅपवर एक नवीन फीचर उपलब्ध होणार असून या फीचरचे नाव ‘डिलीट फॉर एवरीवन’ असे असेल.
आता डिलीट करता येणार व्हॉट्सअॅप ग्रुपवर चुकून पाठवलेला मेसेज
याबाबत इंडिपेन्डट या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अनावधानाने जर एखाद्या ग्रुपमध्ये किंवा व्यक्तीला मेसेज गेले तर पाच मिनिटांच्या आत युजरला या फीचरमुळे ते मेसेज अनसेंड करता येणार आहे. फक्त टेक्स्ट मेसेजच नाही तर फोटो, डॉक्युमेंट, व्हिडिओ, जीआयएफ देखील अनसेंड करता येणार आहे. पण समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज लगेच वाचला तर मात्र तुमच्याकडे काहीच पर्याय नसेल. या फीचरची यशस्वी चाचणी झाली असून लवकरच युजरला या फीचरचा लाभ घेता येणार आहे.