शिन्कासेन बुलेटट्रेनला ५३ वर्षात एकही अपघात नाही


भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी आज म्हणजे १४ सप्टेंबरला होत असून त्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारतात आले आहेत. शिन्कासेन नावाची ही बुलेट भारतातही धावणार आहे. जपानमध्ये ती १९६४ साली सुरू झाली व तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या ५३ वर्षात तिला एकही अपघात झालेला नाही हे तिचे खास वैशिष्ठ आहे. भारतात सर्वप्रथम मुंबई अहमदाबाद रूटवर ही ट्रेन धावणार आहे. ही बुलेट केवळ तिच्या वेगासाठीच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिझाईन व इंजिनाच्या दृष्टीनेही अतिशय खास आहे.

जपानमध्ये ५३ वर्षापूर्वी सुरू झालेली ही ट्रेन कधीही लेट झालेली नाही. क्वचित कारणाने कधी तिला थोडा वेळ लागला तरी ३६ सेकंदांपेक्षा अधिक ती लेट झालेली नाही. यामुळे जपानी लोक वेळेसाठी घड्याळ पाहण्यापेक्षा या ट्रेनच्या येण्याजाण्याच्या वेळेवर अधिक विश्वास ठेवतात असे सांगितले जाते. ही ट्रेन संपूर्णपणे साऊंडप्रूफ आहे यामुळे तिच्या वेगामुळे येणार्‍या आवाजाचा त्रास प्रवाशांना होत नाही. ही ट्रेन ताशी ३५० किमीच्या वेगाने धावते त्यामुळे मुंबई अहमदाबाद हा प्रवास ३ तासांत करता येणार आहे. या ट्रेनसाठी हायस्पीड लाईन तयार केली जाणार आहे.

Leave a Comment