महागडे वकील जेटमलानी यांचा वकीलीचा संन्यास


देशातील सर्वात महागडे वकील अशी ज्यांची ख्याती आहे ते राम जेटमलानी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी वकीलीतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. देशातील बहुतेक सर्व हायप्रोफाईल केसेसमध्ये जेटमलानी यांनी वकील म्हणून काम पाहिले आहे. भारतातील ते सर्वात श्रीमंत वकील मानले जातात. त्यांच्या निवडणुकीसाठी भरलेल्या अर्जानुसार त्यांच्याकडे ५८ कोटी ८२ लाख रूपयांची चल, १.३६ कोटींची अचल संपत्ती असून बँकेत त्यांच्या नावावर १० लाख रूपये कॅश आहे. त्यांच्याकडे ५ लाख रूपये किमतीचे रोलेक्स घड्याळही आहे.

राम जेटमलानी हे केवळ वकील म्हणूनच नव्हे तर कुशल राजकारणी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी दोन वेळा भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून तसेच मंत्री म्हणूनही काम केले आहे. सध्या ते लालू प्रसाद यांच्या राजदकडून राज्यसभेचे सदस्य आहेत. जेटमलानी यांची वकीली कारकीर्दही अतिशय दैदिप्यमान आहे. ते केसच्या एक हिअरींगसाठी २५ लाख रूपये फी आकारत असत. त्यांनी लढविलेल्या केसेसमध्ये अनेक महत्त्वाच्या केसेस आहेत.

इंदिरा व राजीव गांधी यांच्या हत्या करणार्‍यांचे वकीलपत्र त्यांनी घेतले होते. तसेच स्मगलींग किंग हाजी मस्तान यांच्याविरोधातली शस्त्रे तस्करी केस, हवाला प्रकरणात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांच्यासाठी, जेसिका लाल खून प्रकरणात दोषी मनु शर्मा याच्यासाठीही त्यांनी वकीलपत्र घेतले होते. आसाराम बापू याला जामीन मिळण्यासाठी, टू जी मधील संशयित कन्नीमोळी यांच्यासाठी तसेच भ्रष्टाचार प्रकरणात तमीळनाडू माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासाठीही त्यांनी वकीली केली आहे.

Leave a Comment