पॉवरफुल आयफोनला या पॉवरफुल नेत्यांची नाही पसंती


आयफोनने त्यांचे आयफोन एट,एट प्लस व टेन स्मार्टफोन नुकतेच सादर केले आहेत. जगात जेवढे म्हणून लोक स्मार्टफोन वापरतात त्यांची पहिली पसंती नेहमीच आयफोनला असते. अन्य कंपन्यांचे स्मार्टफोन वापरणारेही आयफोन वापरण्याची इच्छा बाळगून असतातच. अॅपलचे आयफोन म्हणूनच स्मार्टफोनच्या दुनियेत पॉवरफुल स्मार्टफोन म्हणून गणले जातात. असे असेल तरी जगातील अनेक पॉवरफुल नेत्यांचा मात्र आयफोनवर भरोसा नाही. सुरक्षा कारणास्तव हे फोन वापरण्यासाठी संबंधित देशांच्या सुरक्षा यंत्रणा आपल्या नेत्याला तशी परवानगी देत नाहीत असे दिसते. कोणत्या देशाचे नेते कोणत्या फोनला पसंती देतात याची ही माहिती


डोनाल्ड ट्रम्प- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अॅपल ही त्यांच्याच देशाची कंपनी असूनही आयफोनचा वापर करू शकत नाहीत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रमाणेच डोनाल्डही आयफोन ऐवजी ब्लॅकबेरीचा फोन वापरतात. ट्रम्प सिंपल मेडिफाईड फोन वापरतात व या फोनवरून त्यांना मेसेज करण्याचीही परवानगी नाही.

थेरेसा मे- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे याही सुरक्षा व चांगले नेटवर्क यासाठी ब्लॅकबेरी फोनला पसंती देतात. ब्रिटनचे माजी पंतप्रधान कमेरून हेही ब्लॅकबेरीचाच वापर करत असत. मिडीयामध्येही मे याच फोनवरून बोलताना बरेचदा दिसतात.


ब्लादीमीर पुतीन-रशियाचे राष्ट्रपती व जगातील पॉवरफुल व्यक्ती अशी ओळख असणारे ब्लादीमीर पुतीन एमटीएस ग्लोनेस ९४५ स्मार्टफोन वापरतात. हा फोन ते २०१२ पासून वापरत आहेत. त्यापूर्वी ते मोबाईल वापरतच नसत. आजही त्यांचा स्मार्टफोनचा वापर अत्यंत मर्यादित आहे.


अंगेला मर्केल- जर्मनीच्या चॅन्सलर अंगेला मर्केल या ब्लॅकबेरी झेड १० स्मार्टफोनचा वापर २०१३ सालापासून करत आहेत. त्यापूर्वी त्या नोकिया फोनचा वापर करत असत. मात्र अमेरिकी गुप्तचर यंत्रणने त्यांचा फोन टॅप केल्याचे प्रकरण घडल्यानंतर त्यांनी फोन बदलला आहे व अधिक सुरक्षित अशा ब्लॅकबेरीला प्राधान्य दिले आहे.


किम जोंग उन- उत्तर कोरियाचा हा तानाशाह एचटीसी बटरफ्लाय या स्मार्टफोनचा वापर करतो. अर्थात तो हा फोन फक्त कुटुंबिय व पार्टी नेते यांच्याशी बोलतानाच करतो.


नरेंद्र मोदी- टेक सॅव्ही अशी ओळख असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बरेचदा आयफोनचा वापर करताना दिसतात. मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आयफोनचा वापर पर्सनल कामांसाठी करतात. सिल्व्हर कलर च्या स्मार्ट फोन वरून ते सेल्फी घेताना अनेकदा दिसतात पण कार्यालयीन कामासाठी ते कोणता स्मार्टफोन वापरतात याची माहिती मिळत नाही. त्यावेळी त्यांच्या हातात काळ्या रंगाचा फोन असतो.

Leave a Comment