‘या’ तारखेला झहीरची होणार सागरिका


लवकरच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे विवाहबद्ध होणार असून, हे दोघे सहजीवनाच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.

याबाबत एका वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात झहीर आणि सागरिका विवाहबद्ध होणार असून, त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आले आहे. हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार असून, मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. दोघांच्याही निकटवर्तीयांना या ‘बिग फॅट वेडिंग’साठी आधीपासूनच निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार आहेत.

पण या दोघांचा विवाहसोहळा कुठे पार पडणार आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नसली तरीही त्यासाठीची तयारी मात्र अगदी उत्साहात सुरु आहे. काही महिन्यांपूर्वीच झहीर आणि सागरिकाने आपले नाते सर्वांसमोर आणले होते. हे दोघेही त्याआधीपासूनच एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.