विद्यार्थ्यांनी तयार केले पाणीपुरी डिस्पेन्सर मशिन


मुंबई : पाणीपुरीचे नुसते नाव जरी काढले तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पण काही दिवसांपासून पाणीपुरीसंदर्भात अनेक बातम्या आल्यामुळे खवय्यांची पाणीपुरी खाण्याची इच्छाच मरून गेली. अनेकदा तर पाणीपुरीच्या ठेल्यावरील अस्वच्छता पाहून पाणीपुरी कितीही आवडत असली तरी नकोशी वाटते.

पण आता यावर मणिपाल तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मार्ग शोधून काढला आहे. त्यांची पद्धत जरा हटके आहे. पाणीपुरी डिस्पेन्सर मशिन मणिपाल तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इंजीनिअर विद्यार्थ्यांनी तयार केल्यामुळे विक्रेत्याला ग्राहकांना पाणीपुरी सर्व्ह करताना स्वच्छतेची काळजी घेता येणार आहे. या पाणीपुरी डिस्पेन्सरमुळे सुक्या पुरीमध्ये ऑटोमॅटीक पाणी आणि सारण भरले जाईल. त्यामुळे पाण्यात हात बुडवून ती सर्व्ह करण्याचा किसळवाणा प्रकार टाळता येईल. या डिस्पेन्सरमुळे ग्राहकांना हायजिनिक पाणीपुरीचा आस्वाद घेता येणार आहे. फक्त या डिस्पेन्सरमध्ये सारण भरण्यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता असणार आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीने किती पाणीपुरी खालल्या त्याचा हिशोब देखील ही मशीन ठेवणार आहे.

बम्पर आणि दादीने कपिल शर्मा शो बंद होण्याबाबत दिल्या प्रतिक्रिया