भाजप सरकारचे रिमोट कंट्रोल संघाकडे नाही – भागवत


नवी दिल्ली – ५० देशांच्या राजदुतांची मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भेट घेतली. भाजप सरकारला संघ नियंत्रित करत नाही आणि संघाला भाजपही नियंत्रित करत नाही. आम्ही स्वतंत्र राहून एका स्वयंसेवकासारखे त्यांच्याशी संपर्क करुन विचारांचे आदान प्रदान करत असतो, असे त्यांनी या भेटीदरम्यान राजदुतांना सांगितले.

भागवत इंडिया फाऊंडेशनकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, इंटरनेटवर होणाऱ्या ट्रोलिंगचे संघ समर्थन करत नाही आणि कोणत्याही भेदभावाशिवाय देशाच्या एकतेसाठी काम करतो. या बैठकीची माहिती भाजप महासचिव राम माधव आणि प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष ए. सुर्यप्रकाश यांनी ट्वीट करुन दिली.