Skip links

प्रभासचे श्रद्धाला ‘स्पेशल गिफ्ट’


सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अभिनेता प्रभाससोबत ‘आशिकी २’ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. श्रद्धा आणि ‘बाहुबली’ प्रभास ‘साहो’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले असून, त्याचे सध्या हैदराबादमध्ये चित्रीकरणही सुरु झाले आहे. सेटवर येण्यास श्रद्धानेही सुरुवात केली असून, तिच्या येण्याच्या निमित्ताने प्रभासने एक खास बेत आखला होता.

‘आशिकी गर्ल’साठी ‘साहो’ची टीम आणि प्रभासने मिळून तेलगू खाद्यपदार्थांची दावत ठेवली होती. यासंबंधीचा एक फोटो श्रद्धानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘इन्स्टा स्टोरी’मध्ये पोस्ट केला. बरेच खाद्यपदार्थ या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये एक दोन नव्हे तर जळपास १५ खाद्यपदार्थ तिच्यासमोर ठेवण्यात आले होते. तिने हा फोटो पोस्ट करत त्यासोबत टीम साहो आणि खुद्द प्रभास तुम्हाला चवदार पदार्थांची दावत देतात तेव्हा…. असे लिहिलेले आहे.

संजूबाबाने शेअर केले जेलमधील भन्नाट किस्से

Web Title: Prabhas 'special gift' to shraddha kapoor