हिंदू नववर्षापासून राज्यात लागू होणार प्लॅस्टीक बंदी


मुंबई : हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टीक बंदी लागू होणार आहे. दुधाच्या पिशव्यांसह सर्व प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे. दुधाच्या पिशव्यांवर डेअरींनी पर्याय शोधावा असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

प्लॅस्टीक कचऱ्यामुळे २९ ऑगस्ट रोजी मुंबई तुंबल्याचे समोर आल्याने प्लॅस्टीक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लॅस्टीक पिशव्यांवरील बंदीची गुढीपाडव्यानंतर काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले गेले आहे. प्लॅस्टीकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांच्या उत्पादनाला देणार प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कापडी पिशव्या निर्मितीचे काम महिला बचत गटांना देणार असून यासाठी बचत गटांना अनुदान देखील देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तरतुद करण्यात येणार आहे. नोटबंदीसारखी प्लॅस्टीक बंदी नाही, लोकांना तयारीसाठी वेळ दिला. प्लॅस्टीक उद्योगाचा विरोध झाला तरी बंदी मागे घेणार नाही. प्लॅस्टीक उद्योगांना कागदी-कापडी पिशव्यांच्या निर्मितीकडे वळावे असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.