Skip links

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पीडीपी व भाजप युतीमुळे फोफवले – राहुल गांधी


वॉशिंग्टन – जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडीपी व भाजप यांची युती करून दहशतवाद्यांना वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण केल्यामुळे तेथील हिंसाचार वाढला असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केला.

दरम्यान यावेळी त्यांनी म्हटले की, भाजप व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) यांची जी युती मोदी यांनी केली ती मोठी चूक होती. काश्मीरमधील तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणण्याचे प्रयत्न पीडीपीने केले त्यात त्यांना यशही येत होते, पण मोदी यांनी भाजप व पीडीपी यांची युती ज्या दिवशी घडवून आणली त्यावेळी पीडीपीच्या तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणणारा पक्ष म्हणून स्थान संपुष्टात आले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पीडीपी व भाजप युतीमुळे फोफवले आहे. त्यामुळे तेथील हिंसाचारातही वाढ झाली. पीडीपीचे अनेक सदस्य दहशतवाद्यांना जाऊन मिळाले अशी माहिती काश्मीरमधील गुप्तचरांनी मला दिल्याचा दावा गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की, भाजप व पीडीपीची युती संकुचित राजकीय फायद्यासाठी झाल्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनाच नव्हे तर इतरांनाही मोकळे रान मिळाले आहे, या धोरणात्मक चुकीची मोठी किंमत भारताला मोजावी लागली.

Web Title: PDP and BJP combine terrorists in Kashmir - Rahul Gandhi