Skip links

अवजड वाहनांना मुंबईत दिवसा ‘नो एंट्री’


मुंबई : सकाळी ७ पासून रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना मुंबईच्या वाहतूक विभागाने मुंबईत प्रवेश न देण्याचे नोटिफिकेशन काढले आहे. हा निर्णय मुंबईत दररोज होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेतला आहे.

दिवसेंदिवस मुंबईत वाढत जाणाऱ्या वाहनांचा परिणाम वाहतुकीवर होतो आहे. खास करुन सकाळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये मुंबईकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यातच अवजड वाहनांमुळे यात भर पडते. म्हणूनच दिवसा अवजड वाहनांना प्रवेश न देण्यासाठीचं नोटीफिकेशन वाहतूक विभागातर्फे काढण्यात आले आहे. या अवजड वाहनांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचाही समावेश आहे. या बसेसला प्रवेश मिळेल, मात्र त्यांना बसेस रस्त्यांवर पार्क करता येणार नाहीत. ज्या ठिकाणी पे अॅन्ड पार्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याच ठिकाणी या बसेस पार्क करता येतील. तसेच या बसेसना मुंबईत येण्यासाठी काही रस्ते ठरवून देण्यात आले आहेत.

Web Title: 'No entry' for heavy vehicles in Mumbai