छोट्या पडद्यावर एकत्र येणार ‘खिलाडी-अनाडी’


तब्बल नऊ वर्षांनंतर बॉलिवूडची सर्वांत आवडती जोडी अक्षय कुमार आणि सैफ अली खान आता पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणार असून अक्षयचा ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोच्या पहिल्याच भागात सैफ विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून या एपिसोडचे चित्रीकरण सुरु होणार आहे. पण गुरुवारी अक्षय आणि सैफ यांचे एकत्र शूटिंग करण्यात येईल. या शोमध्ये दोघेही आपल्या ‘मै खिलाडी तू अनाडी’ या सुपरहिट गाण्यावर परफॉर्म करणार असल्याचेही वृत्त आहे. १९९४ पासून २००८ पर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये सैफ आणि अक्षयने एकत्र काम केले आहे.

मलाइका अरोराने आपल्या मादक अदानी केले घायाळ