सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाने देशभरातील ४९ लाख सरकारी कर्मचारी आणि आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात एका टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्ती वेतनधारकांनाही याचा लाभ होणार आहे. तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबतच्या ग्रॅच्युइटीची मर्यादासंदर्भातील विधेयकाला बैठकीदरम्यान मंजुरी देण्यात आली आहे.

यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराच्या ४ टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता हा भत्ता वाढवून ५ टक्के असा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सुमारे ४९ लाख २६ हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तर देशभरात ६१.१७ लाख कर्मचारी नेवृत्तीधारक आहेत. त्यांनाही याचा लाभ होणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्येक्षतेखाली प्रथमच मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘पेमेंट ऑफ ग्रॅ्च्युइटी अॅक्ट- १९७२’ या कायद्यात बदल करून सरकार खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मर्यादा मिळवून देण्याच्या विचाराधीन आहे.

Leave a Comment