तुम्ही पाहिला आहे का सचिन खेडेकरांच्या आगामी ‘बापजन्म’चा ट्रेलर !


नुकताच सचिन खेडेकर यांची मुख्य भूमिका असणारा आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘बापजन्म’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सचिन खेडेकर आपल्याला या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून मुले आणि वडील यांच्यातील नात्यात वाढत चाललेल्या दुराव्यावर भाष्य करण्यात आले आहे.

अनेकदा वडील संसार, मुले, त्यांचे शिक्षण या सगळ्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर वाहताना रुक्ष आणि कठोर होतात. त्यांच्याकडूनही या प्रवासात काहीवेळा नकळत काही चुका होतात. भास्कर पंडीत अर्थात सचिन खेडेकर त्या चुका सुधारण्याचा निश्चय ठरवतात आणि आपल्या मित्रांसोबत एका मिशनला सुरूवात करतात. हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.