तुम्हाला माहीत आहे का अक्षयच्या पाकिटात कुणाचा फोटो असतो ?


बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आता ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पाचव्या पर्वामध्ये सुपर जजची भूमिका सांभाळणार असून अक्षयने दिग्गज अभिनेता चार्ली चॅपलिन हे सर्वात मोठा एन्टरटेनर होते आणि त्यांचा फोटो कायम आपल्या पाकिटात ठेवत असल्याचे सांगितले.

सर्व काळामधील चार्ली चॅपलिन हे सर्वात मोठा एन्टरटेनर होते यात कोणतीच शंका नाही. या क्षणाला आजदेखील त्याचा फोटो माझ्या पाकिटामध्ये आहे. सीन जेव्हा क्लोज अपमध्ये असतो तेव्हा आयुष्यात ट्रॅजेडी असते आणि जेव्हा सीन लाग शॉटमध्ये असतो ती कॉमेडी असते, या त्यांच्या म्हणण्याशी मी सहमत असल्याचे अक्षय कुमार म्हणाला. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या पाचव्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडच्या शूटींगसाठी तो आला होता. अक्षय कुमारसोबत मल्लिका दुआ, झाकिर खान आणि हुसेन दलाल हे शोचे मेंटर्स असतील. लवकरच स्टार प्लसवर ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शो प्रसारित होईल.