स्वस्त झाले आयफोन ७, आयफोन ६


आयफोन ८, आयफोन ८ प्लस आणि आयफोन एक्स हे बहुचर्चित फोन अॅपलने लाँच केल्यानंतर लगेचच जुन्या आयफोन्सच्या किमतींमध्ये कंपनीने अपेक्षेप्रमाणे कपात केली आहे. अॅपलकडून आयफोन ६ एस, आयफोन ६ एस प्लस, आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.

अॅपलने त्यानुसार आयफोन ७ (३२ जीबी)च्या किमतीत ७ हजारांची घट केल्यामुळे आयफोन ७ आता ४९ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. आयफोन ७ प्लसच्या (३२ जीबी) किमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे. आधी ६७ हजार ३०० रुपयांना मिळणारा आयफोन ७ प्लस आता ५९ हजार रुपयांना खरेदी करता येईल. आधी ६५ हजार २०० रुपयांना मिळणाऱ्या आयफोन ७ (१२८ जीबी) ची किंमत आता ५८ हजार रुपये ऐवढी झाली आहे. तर आधी ७६ हजार २०० रुपयांना उपलब्ध असलेला आयफोन ७ प्लस (१२८ जीबी) आता ६८ हजार रुपयांना विकत घेता येईल.

त्याचबरोबर आयफोन ६ सिरीजमधील फोन्सच्या किमतींमध्ये मोठी कपात झाली असून आयफोन ६ एस प्लसच्या (३२ जीबी) किंमतीमध्ये ७ हजारांची घट झाल्यामुळे हा फोन आता ४९ हजारांना खरेदी करता येणार आहे. तर ६५ हजारांचा आयफोन ६ एस प्लस (१२८ जीबी) आता ५८ हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. आयफोन ६ एस (३२ जीबी) हा ४६ हजार ९०० रुपयांना मिळणारा फोन आता ४० हजार रुपयांत खरेदी करता येईल. तर आयफोन ६ एस (१२८ जीबी) ची किंमत ४९ हजार रुपयांवर आली आहे.

Leave a Comment