ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विराट सेनेला ठरवले सफाई कामगार


विराट कोहलीसह भारतीय संघातील खेळाडूंचा एक जुना फोटो ऑस्ट्रेलियातील पत्रकार डेनिस फ्रिडमॅन याने आपल्या ट्विट अकाउंटवरुन शेअर केला आहे. भारतीय खेळाडू मैदानात साफसफाई करताना या फोटोमध्ये दिसत आहेत. मागील वर्षी भारतीय संघाने मागील वर्षी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर स्वच्छता मोहिम राबवली होती त्यावेळेचा हा फोटो आहे.


फ्रिडमॅनने या फोटोला भारतीय खेळाडू पाकिस्तानमधील लाहोरच्या मैदानावर रंगलेल्या विश्व इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी लाहोरच्या मैदानावर साफसफाईचे काम करत आहेत, असे कॅप्शन दिले आहे. पाकिस्तानी तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी फ्रिडमॅनच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या ट्विटचा पाकिस्तानी चाहते आनंद घेत असताना भारतीय चाहत्यांनी या ट्विटचा चांगलाच समाचार घेतला आहे.