शंभर रूपयाचं नाणं चलनात येणार


नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारने दोनशे रूपयांची नोट चलनात आणल्यानंतर आता शंभर रूपयाचे नाणे लवकरच चलनात येणार आहे. याबरोबरच पाच रूपयांचे नवे नाणेही चलनात येणार आहे.

44 मिमी आणि 35 ग्रॅम वजनाचं शंभर रूपयांचे नाणं असेल. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोक स्तंभ तर खालच्या बाजूला सत्यमेव जयते लिहिलेले असेल. नाण्याच्या एका बाजूला भारत अन् दुसऱ्या बाजूला INDIA असं लिहिलेलं असेल. चार धातूंनी हे नाणे तयार करण्यात आले आहे. मागच्या बाजूला एम.जी. रामचंद्रन यांचा फोटो आहे.

पाच रुपयांचं नवं नाणं 23 मिमी आणि 6 ग्रॅम वजनाचे आहे. नाण्याच्या वरच्या बाजूला अशोक स्तंभ असेल आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल. अशोक स्तंभ, भारत आणि INDIA असं वेगवेगळ्या बाजूला लिहिलेलं असेल. तीन धातूंनी हे नाणं तयार करण्यात आले आहे. डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही नाणी चलनात येणार आहे.

Leave a Comment