श्रेयस तळपदेने झाडले ‘केकेआर’चे कान !


नेहमीच फिल्म जगतातील लोकांच्या खासगी बाबींवर वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करण्यासाठी कमाल राशिद खान (कु)प्रसिद्ध आहे. बिग बॉस शोमधून त्याच्या आक्रमक आणि उद्धट वागणुकीमुळे त्याची गच्छंती झाली होती. हल्ली त्याने स्वतःला समीक्षक म्हणत चित्रपटाचे परीक्षण करायला सुरुवात केली आहे. त्याच्या समीक्षणाचे व्हिडीओज बघणे म्हणजे वेगळ्या पद्धतीची करमणूक असते असे फिल्म इंडस्ट्रीमधील बरेचजण खासगीत बोलतात.

आता नुकताच प्रदर्शित झालेल्या श्रेयस तळपदेने दिग्दर्शकीय पदार्पण केलेल्या आणि त्याने व सनी देओलने निर्मिती केलेल्या ‘पोश्टर बॉईज’चे त्याने परीक्षण करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. पण त्याबद्दल ट्विटरवर सडकून टीका करत शिव्यावजा अपशब्द वापरले. त्यावर नेटिझन्सनी आक्षेप तर घेतलाच परंतु मराठी बाणा असलेल्या श्रेयस तळपदेने केआरकेला शाब्दिक चपराक लगावली आहे व ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आपल्या ट्विटचा समारोप केला आहे.