Skip links

नेपाळमध्ये गेली पळून हनीप्रीत


नवी दिल्ली : राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत ही आदित्य इंसासोबत नेपाळमध्ये लपून बसली असल्याचे वृत्त आहे. या दोघांसोबत आणखी एक व्यक्ती असल्याचे देखील बोलले जात आहे. हनीप्रीतला शोधण्यासाठी हरियाणा पोलिसांनी नेपाळ पोलिसांची मदत मागितली आहे.

राम रहीमची ३० वर्षीय हनीप्रीत दत्तक मुलगी असल्याचा दावा आहे. राम रहिम बलात्कार प्रकरणात वीस वर्षाची शिक्षा भोगत आहे. बाबावर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती ज्यामध्ये ३६ लोकांचा मृत्यू देखील झाला होता. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे यामध्ये नुकसान झाले होते. बाबाच्या अनेक ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी करत अनेक गोष्टी उघडकीस आणल्या आहेत. तपासात रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहे. यामध्ये हनीप्रीतचा देखील सहभाग असू शकतो. एक सप्टेंबर रोजी हनीप्रीत विरुद्ध लुकआउट नोटीस देखील जारी केली गेली आहे.

Web Title: Honeypreet fled to Nepal