लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी राम रहीम पित होता ऑस्ट्रेलियन ‘सेक्स टॉनिक’


चंदीगड – साध्वींवर केलेल्या बलात्कार प्रकरणामुळे शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम हा लिंग पिसाट असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून तो लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियातून खास सेक्स टॉनिक मागवत असल्याचेही डेराच्या एका माजी सदस्याने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राम रहीमला कारागृहात अस्वस्थ वाटत असल्याने प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक कारागृहात बोलावले होते. अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा त्यावेळी झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार या डॉक्टरांच्या पथकात मानसिक रोग तज्ज्ञांचाही समावेश होता. मधुमेहासह त्याला इतरही व्यांधींचा त्रास होत असल्याची माहिती राम रहीमने कारागृह प्रशासनाला दिली होती. त्यासाठी शनिवारी तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.

नाव न छापण्याच्या अटीवर या पथकातील एका डॉक्टरांनी सांगितले की, राम रहीम हा सेक्स अॅडीक्ट आहे. त्याला शारीरिक समाधान न मिळाल्याने त्याची अस्वस्थता वाढली आहे. त्याच्या अस्वस्थतेचे कारणही तेच आहे. त्याचा उपचार होऊ शकतो, पण उशीर झाल्यास त्याचा आजार अधिक गंभीर होण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली आहे.

त्याचबरोबर राम रहीम हा अमली पदार्थांचे सेवन देखील करत असल्याचे बोलले जात आहे, पण त्याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळाली नाही. डेराच्या एका माजी सदस्याने राम रहीम हा सेक्स टॉनिक घेत असल्याचा खुलासा केला आहे. राम रहीम रोज एनर्जी ड्रींक्स आणि टॉनिक घेत असल्याचेही त्याने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातून खास सेक्स टॉनिक तो मागवत असे. ते घेऊनच तो डेरातील मुलींवर बलात्कार करत होता असेही त्या सदस्याने सांगितले आहे.