‘पोस्टर बॉईज’मुळे पुन्हा देओल बधुंना प्रेक्षकांची पसंती


यमला पगला दीवाना -2 चित्रपटानंतर पुन्हा पुर्नरागमन करणारे सनी देओल आणि बॅाबी देओल हे दोन्ही पोस्टर बॉईज चित्रपटामुळे पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

अभिनेता श्रेयस तळपदे सोबत देओल बंधुंनी पोस्टर बॉईजमध्ये धूम ठोकली आहे. काही चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटावर टीका केली असली तरी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे. सुरवातीला काहीसा अल्प प्रतिसाद मिळालेला या चित्रपटाला पाहण्यास सध्या गर्दी होत आहे.

गेल्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यादिवशी या चित्रपटाने 1 कोटी 75 लाख रूपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी 2 कोटी 40 लाख रूपये तर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 3 कोटी 40 लाख रूपयांचा गल्ला जमा केला. श्रेयस तळपदे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.