दगडूशेठ हलवाई गणपतीलाही भक्तांनी फसवले


पुणे – पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीला लालबागच्या राजाप्रमाणेच भक्तांनी फसविल्याचे समोर आले आहे. मंडळाने गणपतीसमोर ठेवलेली दानपेटी उघडल्यानंतर त्यात पाचशे, हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा सापडल्या आहेत. जुन्या नोटांमधील रक्कम २५ हजाराच्या घरात असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वाहिनीने दिले आहे.

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी यावर्षी साडेतीन कोटी रुपयांचे दान आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पुन्हा जमा करण्यासाठी एक मुदत दिली होती. ज्यांना ठरलेल्या मुदतीत ही रक्कम जमा करता आली नाही अशा भक्तांनी स्वत:कडे राहिलेल्या नोटा गणेशाच्या चरणी अर्पण केल्या आहेत.

दरम्यान लालबागच्या राजासमोर ठेवण्यात आलेली दानपेटी दोन दिवसांपूर्वी उघडल्यानंतही असाच प्रकार समोर आला होता. लालबागचा राजा गणपतीच्या दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजाराच्या ११० जुन्या नोटा सापडल्या. ज्या नोटांचे एकुण मुल्य १ लाख १० हजार एवढे आहे.