Skip links

विवाहपूर्व शारिरीक संबंधांवर काय म्हणते भूमी पेडणेकर


नुकत्याच रिलिज झालेल्या शुभ मंगल सावधान आणि टॅायलेट एक प्रेम कथा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली भूमी पेडणेकर हीने वैवाहीक जीवन आणि शारिरीक संबध या विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधला. लग्नापूर्वी शारिरीक संबध असणे ही सामान्य बाब आहे, असे ती म्हणाली.

भोपाळ येथे आयोजित इंडिया टुडेच्या कार्यक्रमात भूमी पेडणेकर हीने मनमोकळेपणाने या विषयावर आपले मत नोंदविले. आजकाल बंद दरवाजाच्या मागे चोरी- चुपके असे प्रकार होतात, ही काही नवीन बाब नाही. विवाहपूर्वी शारिरीक संबध हे आपण लपवून करतो. आपण त्याचे शिकार होतो, असे भूमी म्हणाली.

कुठल्याही रिलेशनशीपचे यश हे फक्त भावनांवर अवलंबून नसते. असे नाते पन्नास टक्के शारिरीक आणि पन्नास टक्के भावनिक असते. आजकालच्या तरूणाईला करिअर इतकीच सर्वात जास्त चिंता ही रिलेशनशिपची असते, असेही भूमीने सांगितले.

इंडिया टुडेच्या यूथ कॉन्क्लेव माइंड रॉक्स कार्यक्रमात आयोजित मुलाखतीत भूमीने आपले करिअर आणि व्यक्तिगत जीवनातील विविध विषयावर अनेक गोष्टी यावेळी उपस्थितांशी शेअर केल्या.

Web Title: What to say Bhumi pednekar on physical relations before marriage