मुंबई : बिझनेस फीचरनंतर आता अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी व्हॉट्सअॅपने दोन नवे फीचर्स आणले असून यामध्ये पिक्चर टू पिक्चर आणि टेक्स्ट स्टेटस या दोन फीचर्सचा समावेश आहे.
अँड्रॉईड आणि आयओएस युझर्ससाठी व्हॉट्सअॅपचे दोन नवे फिचर
व्हिडिओ कॉलिंग पिक्चर टू पिक्चर फीचरमुळे आणखी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. व्हिडिओ कॉल चालू असताना विंडो छोटी करुन तुम्ही चॅटिंगही करु शकता. या फीचरची चाचणी कंपनीने सुरु केली असून PiP या नावाने या फीचरला ओळखतात. हे फीचर लवकरच सर्व युझर्ससाठी रोल आऊट होण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट व्हॉट्सअॅपने जारी केल्यामुळे टेक्स्ट स्टेटस व्हॉट्सअॅप युझर्सना शेअर करता येणार आहे. फेसबुक प्रमाणेच तुम्ही आता कलरफुल बॅकग्राऊंडमध्ये स्टेटस शेअर करु शकता. व्हॉट्सअॅपच्या ऑफिशिअल व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे.
शाहरुख आणि सलमानला केले पहलाज निहलानी यांनी टार्गेट