आजच्या दिवशी क्रिकेटच्या देवाने झळकवले होते पहिले एकदिवसीय शतक


क्रिकेटचा देव मानला जाणार्‍या सचिन तेंडूलकरच्या अनेक चाहत्यांना त्याने बनविलेले क्रिकेट विश्वातील सारे रेकॉर्ड्स अगदी तोंडपाठ असून सचिन तेंडूलकरने आज २३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक ठोकले होते.

सचिन तेंडूलकरने तब्बल ७८ सामन्यांनंतर पहिले शतक ठोकले होते. श्रीलंकेमध्ये सिंगर कपच्या मालिकेत भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान सचिनने ११० धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये त्याने एकूण १८४२६ धावा केल्या तर ४६३ सामने खेळले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावांचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडूलकरने ९६ अर्ध शतके ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणाराही सचिन हा एकमेव खेळाडू आहे. कसोटी सामन्यात सचिनने ५१ शतके ठोकली आहेत.