जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर


नवी दिल्ली : अवघ्या एका वर्षात मोबाईल युजर्सच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने आता आणखी एक जबरदस्त ऑफर बाजारात उपलब्ध करुन दिली आहे. क्लियरटेक्ससोबत हातमिळवणी करत एअरटेलने एन नवी बिझनेस सेवा सुरु केली आहे. जीएसटी अॅडव्हान्टेज असे नाव या सेवेला देण्यात आले आहे.

अद्यापही नागरिकांमध्ये जीएसटी भरण्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. पण यावर एअरटेलने एक मार्ग शोधला आहे. हा पर्याय खासकरून छोट्या व्यापा-यांसाठी आहे. जेणेकरून ते कुठल्याही समस्येशिवाय जीएसटी भरु शकतील. जीएसटी रजिस्ट्रेशन केल्यास एअरटेल फ्री डेटा देणार आहे. जीएसटी फाईल करण्यासाठी तुम्हाला www.airtel.in/gst-advantage येथे जावं लागणार आहे. या सेवेच्या माध्यमातून रजिस्टर करणा-या ग्राहकांना एअरटेलतर्फे १८ जीबी ४ जी डेटा देण्यात येणार आहे. हा डेटा २ जीबी प्रति महिना या प्रमाणे पूढील तीन महिन्यांपर्यंत मिळणार आहे. युजर्स जीएसटी अॅडव्हान्स डेस्कवर सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत अॅक्सेस करु शकतात. तुम्हाला जीएसटी फाईल करण्यासंदर्भात येणा-या अडचणींसंदर्भातील उत्तरे आणि मदत येथे मिळेल.

हार्दिकसोबतच्या नात्याबाबत काय म्हणते परिणीती

Leave a Comment