मोबाईल अॅपच्या वापरावर भारतीय दर दिवशी खर्ची घालतात चार तास : सर्वेक्षण


बंगळुरू – भारतीय दर दिवशी मोबाईल अॅपच्या वापरावर चार तास खर्च करतात. भारतात अनेक नोकरीच्या ठिकाणी आठ तासांची शिफ्ट असते, पण मोबाईलमधील अॅपच्या वापरावर खर्च होणारे चार तास म्हणजे सर्वसामान्य लोक करत असलेल्या आठ तासांच्या ड्युटीच्या निम्मा वेळ आहे. मे २०१७ मधील अॅप्लिकेशनचे विश्लेषण करणारी संस्था अॅप अॅनीच्या अभ्यासानुसार, भारत देश अॅन्ड्रॉइड फोनमधील अॅपवर जास्त वेळ घालविणाऱ्यांच्या संख्येत टॉप पाचमध्ये असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

एन्ड्रॉइड अॅपवर सगळ्यात जास्त सक्रिय असणारी वीस टक्के लोक भारतात आहेत. यात भारताचा क्रमांक दक्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझील आणि जपाननंतर लागतो. दक्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझील आणि जपानमधील मोबाईल अॅपचा सर्वात जास्त वापर करणारे युजर्स दिवसातील पाच तास अॅप्सच्या वापरावर खर्च करतात. विशेष म्हणजे भारतात मोबाईल अॅपचा जास्त वापर न करणारे युजर्सही दिवसातील दीड तास मोबाईलच्या वापरावर खर्च करतात. तसंच अति जास्त वापर आणि कमी वापर यांच्यामधील टप्प्यात येणारे युजर्स दिवसातील अडीच तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात.

Leave a Comment