आपण डुप्लिकेट कॉन्टॅक्‍टस्‌ने हैराण आहात?


जर तुम्ही मोबाईलमध्ये असणाऱ्या एकाच नावाच्या अनेक कॉन्टॅक्‍टस्‌ने हैराण असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण हे डुप्लिकेट नंबर आणि नाव त्याचा शोध घेऊन ते नाव आपल्या कॉन्टॅक्‍ट लिस्टमधून वगळता येणे शक्‍य आहे. यामुळे केवळ फोनमधील जागेत बचत होणार नाही तर त्याचबरोबर कॉन्टॅक्‍टस्‌ मॅनेज करणे देखील सोपे जाईल.

गूगलने आपले कॉन्टॅक्‍ट ऍप आता प्ले स्टोरवर अपलोड केले आहे. आतापर्यंत हे ऍप केवळ गूगलचे पिक्‍सल, नेक्‍सस आणि अँड्राईड वन सारख्या स्मार्टफोनसाठीच उपलब्ध होते. मात्र आता गूगलने या ऍपलला प्ले स्टोरमध्ये सामील केले आहे. अर्थात हा ऍप केवळ अँड्राइड 5.0 आणि त्याच्यावरील ऑपरेटिंग सिस्टमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करता येतो.

गूगल कॉन्टॅक्‍टस ऍपच्या मदतीने यूजर एकाचवेळी अनेक गूगल अकाऊंट लिंक करू शकणार आहेत. एकाचवेळी ऍप डाऊनलोड केल्यानंतर हा ऍप आपोआप आपल्या गूगल अकाऊंटला लिंक करेल आणि त्याचे सर्व कॉन्टॅक्‍ट नंबर सामील करून घेईल. याशिवाय आपल्या फोनमध्ये असलेली कॉन्टॅक्‍ट लिस्ट देखील दिसू लागेल. याशिवाय आपल्याला ऍप डेटा बॅकअप, सिंक आणि नंबर मर्ज करण्याचा पर्याय देखील देते. यानुसार आपण आपल्या फोनमध्ये असलेले डुप्लिकेट नंबर काढून टाकू शकता किंवा आपसात समाविष्ट करू शकता.

Leave a Comment