ही बँक ग्राहकांना घरपोच रक्कम देणार


देशातील बहुतेक बँकानी त्यांच्या एटीएम सेवा सुरू केल्या आहेत मात्र सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांसह खासगी बँकाही या सेवांसाठी शुल्क आकारत आहेत. याचवेळी देशातील इंडसइंड बँक ग्राहकांसाठी अनेक सेवा घरपोच व मोफत घेऊन आली असून त्यांच्या वेबसाईटवर त्या संदर्भातली माहिती दिली गेली आहे.

या नुसार बँकेच्या प्रत्येक ग्राहकासाठी दिवसातून एकदा चेक घरून नेऊन बँकेत डिपॉझिट करणे, रोख रक्कम हवी असल्यास घरपोच देणे या सेवा मोफत दिल्या जाणार आहेत. त्यासाठी बँकेला केवळ फोन करून काम होणार आहे. चेक भरायचा असेल तर बँकेचा जबाबदार माणूस घरी येऊन चेक नेईल व तो तुमच्या खात्यात जमा करेल तसेच तुम्हाला रोख रक्कम हवी असेल तर तुमच्या खात्यातून तुम्हाला हवी असलेली रक्कम काढून घरपोच दिली जाणार आहे. अर्थात या दोन्ही साठी १ लाख रूपयांची लिमिट घातली गेली आहे. ग्राहक त्याची कोणतीही तक्रार अथवा गरज थेट जबाबदार बँक अधिकार्‍याशी फोनवरून संपर्क साधून सांगू शकणार आहे. ग्राहकाने महिन्यात जेवढे चेक दिले असतील त्याचे फोटो बँक स्टेटमेंटमध्ये ग्राहकाला दिले जाणार आहेत.

Leave a Comment