अतिश्रीमंतांसाठीच असलेल्या सोशल साईटस व अॅप्स


आजकाल सर्व दुनिया फेसबुक, ट्वीटर सारख्या सोशल साईटमुळे एकत्र आली आहे. हजारो अॅप्समुळेही एकमेकांच्या संपर्कात राहणे, एकमेकांविषयी जाणून घेणे आता एका बोटाचा खेळ राहिला आहे. त्यातही जगातील श्रीमंत कसे राहतात, काय करतात, त्यांची घरे कशी, त्यांचे वागणे कसे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यांना असते. असे अनेक बडे खिलाडी सार्वजनिक सोशल मिडीयावरही असतातही.मात्र आपल्याला कदाचित हे माहितीही नसते की कांही साईटस व अॅप अशीही आहेत की जी केवळ अतिश्रीमंत किंवा सुपररिच लोकांसाठीच बनविली गेली आहेत व त्याच्या आधारे ते आपसात संपर्क साधत असतात. या साईटचा सदस्य कुणाही सर्वसामान्यांना करून घेतले जात नाही.

अर्थात अशा साईट व अॅप्ससाठी अतिश्रीमंतही भलीभक्कम रक्कम मोजतात. त्यातील कांहींची माहिती अशी-


अस्मॉलवर्ल्ड किंवा एएसडब्ल्यू ही स्वीडनच्या एका तंत्रज्ञाने तयार केलेली साईट याचे उदाहरण आहे. फेसबुक लाँच झाले म्हणजे २००४ च्या वर्षातही ही साईटही लाँच केली गेली मात्र त्याचे सदस्य ऐरागैरा कुणीही होऊ शकत नाही. या साईटचे सदस्यत्व मिळविण्यासाठी पहिल्यापासून जो या साईटचा मेंबर आहे त्याच्याकडून तुम्हाला निमंत्रण मिळावे लागते किंवा जे अतिश्रीमंत यासाठी फॉर्म भरतात त्यांच्या नावाला साईटच्या संचालकांची मान्यता मिळावी लागते.

ईएलईक्युरी ही अशीच दुसरी साईट. यावर फक्त अतिश्रीमंतांनाच लॉग इन करता येते. त्यासाठी ग्राहकाकडून एक फॉर्म भरून घेतला जातो आणि मेंबर बनण्यासाठी तुमच्याकडून तगडी फी आकारली जाते. अशीच अन्य एक साईट आहे द मार्क. त्याची टॅगलाईनच मुळी आम्ही सर्वसामान्यांसाठी नाही अशी आहे. ही साईट प्रसिद्ध, यशस्वी लोकांसाठी असून त्यासाठीही किमान ८३३७५ रूपये मोजून त्याचे सदस्य व्हावे लागते.


डेटिंगसाठी असलेली राया अॅप् कांही नवे एक्स्लोअर करू इच्छीणार्‍यांसाठी आहे. ही नॉर्मल डेटिंग अॅप् नाही. तिथे नियम अतिशय कडक आहेत. सदस्य होऊ इच्छीणार्‍या अतिश्रीमंतांचेही येथे प्रथम स्क्रीनिंग केले जाते. त्यासाठी त्यांचे इन्स्टाग्राम अकौंट पूर्ण चेक केले जाते. या व्यक्तीचा जगावर किती प्रभाव आहे, किंवा तिच्या क्षेत्रात किती दबदबा आहे याची माहिती घेऊन मगच संबंधिताला सदस्य करून घ्यायचे वा नाही याचा निर्णय घेतला जातो.

Leave a Comment