चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीचे हार्डवेअर व सर्च इंजिन जायंट गुगल यांचे इझी सॉफ्टवेअर अँड्राईड वन चे काँबिनेशन असलेला मी ए वन हा स्मार्टफोन दिल्लीत लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत १४९९९ रूपये आहे व तो १२ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट व शाओमीच्या वेबसाईटवर मिळू शकणार आहे. हा फोन क्रोमा, ईझोन वर ऑफलाईनही उपलब्ध करून दिला जात आहे.
शाओमी गुगलचा पहिला स्मार्टफोन मी ए वन लाँच
या वेगळ्या फोनसाठी मेटल बॉडी, ५.५ इंची फुल एचडी, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन, फोनच्या मागच्या बाजूवर हाताचे ठसे पडू नयेत म्हणून पोयरेालिप्टिक कोटींग दिले गेले आहे. १२ एमपीचा वाईड अँगल व १२एमपीचा टेलिफोटो लेन्स असलेला ड्युल कॅमेरा, ५एमपीचा फ्रंट कॅमेरा, ४ जीबी रॅम, गुगल अँड्राईड वन ओएस अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. शाओमीचा त्यांच्या स्वतःचा इंटरफेस एमआययूआय नसलेला हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या फोनसाठी इन्फ्रारेड ब्लास्टर दिला गेला आहे याचा वापर घरातील अप्लायन्सेसचा रिमोट म्हणूनही करता येणार आहे. फोनसाठी ३०८० एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे.